Advertisements
चंद्रपूर: रामाळा तलाव खोलीकरण तसेच सौंदर्यीकरण व्हावे आणि शहरातील ऐतिहासिक धरोहरचे संवर्धन होण्याकरिता श्री बंडू धोत्रे यांनी 22 फेब्रुवारीपासून पुकारलेल्या अन्नत्याग सत्याग्रहास आज दिनांक 26 फेब्रुवारीला भेट देऊन शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात जाहीर पाठिंबाचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरिले, प्रभाग अध्यक्ष मंगेश बोकडे, मयुर येरणे, शुभम प्रजापति उपस्थित होते.