गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील पिपर्डा,वनसडी, कारगाव या गावाचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजना व आदिवासी उप योजनेंतर्गत मंजूर होता.रस्ता बांधकामासाठी अंदाजे दोन वर्षांपासून कंत्राटदाराकडून दिरंगाई होत होती.परिणामी काम रखडले.यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात मानसीक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.ही बाब लक्षात घेऊन राकाँ नेते सैय्यद आबीद अली यांनी संबंधित विभागाकडे सदर रस्त्याच्या कामाला तातडीने सुरूवात करण्याची मागणी केली.काम सुरू न झाल्यास आंदोलन उभारण्याचा सुद्धा इशारा अली यांनी दिला होता.याविषयी सा.बा.बांधकाम विभाग उप अभियंतांनी सकारात्मक प्रतिसाद देत कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे सांगितले.अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले.संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला लागणार्या संपूर्ण साहित्याची अवघ्या दोन दिवसात जुळवाजुळव केली व येत्या पंधरा दिवसांत सदर रस्त्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन देत वेगाने कामाला सुरुवात केली आहे.कंत्राटदाराच्या दिरंगाईनेच मागील दोन वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागत असल्याबद्दल नागरिकांत उत्साह संचारल्याचे चित्र पहायला मिळत आहे.रस्ता अभावी नेहमी होणार्या त्रासापासून आता सुटका मिळत असल्याची भावना व्यक्त होत असून नागरिकांनी अली यांचे आभार मानले आहे.
अखेर, त्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
Advertisements