कोरपना येथे भाजपचे बुथ संपर्क अभियान कार्यक्रम

0
148
Advertisements

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपच्या वतीने मंगळवार रोजी बुथ संपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरपना येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर होते तर उदघाटन जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी केले.गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,किशोर बावणे,पुरूषोत्तम भोंगळे,नथ्थु ढवस,सरपंच अरूण मडावी,गोपाल मालपाणी,रमेश मालेकर, नगरसेवक अमोल आसेकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.नामदेवराव डाहुले यांनी नवनिर्वाचित शेरज(बु)सरपंच तिरंणकर यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत केले.याचबरोबर भाजपच्या आजी-माजी सरपंचांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
सदर अभियानात बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,पेज प्रमुखांबद्दल तसेच प्रत्येक बुथ रचनेची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्त्यांची असून ही प्रत्येकाने पार पाडावी असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.बुथ मजबूत करण्यासाठी २३ कामांच्या यादीचे वाचन तसेच तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख,पेज प्रमुख व इतर कामांची माहिती देत,हे अभियान लवकरात लवकर तालुक्यातील गावागावात आणि घराघरात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन वजा विनंती हिवरकर यांनी प्रास्ताविकात केली.उपस्थित इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुखांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश पिंपळकर,प्रमोद पायघन,दिनेश खडसे,नारायण कोल्हे आदींनी सहकार्य केले.संचालन पुरुषोत्तम भोंगळे तर आभार प्रमोद कोडापे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here