“कोरोना ईज़ बॅक” गडचांदूरकर मात्र बेफिकीर

0
534
Advertisements

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.काही महिन्यांपासून मंदावलेला कोरोना अचानक वेगाने पसरत असून राज्य सरकार पुन्हा निर्बंध लादण्याच्या विचारात दिसत आहे.या पार्श्वभूमीवर लग्न,सभा,बैठका,सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांना कोविड संबंधी नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली असून उक्त निर्देशांचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम आपत्ती व्यवस्थापन कायदा यामधील तरतुदी नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
इतर शहरात कारवायांचे सत्र सुरू असतानाच गडचांदूरकर मात्र बेफिकीरीने वावरताना दिसत आहे.शहराचा फेरफटका मारला असता नागरिक सर्रासपणे कोविड विषयक नियमांचे उल्लंघन करताना आढळतात.काही अपवाद वगळता कित्तेक ठिकाणी लोकांनी मास्क व सोशल डिस्टंसिंगला अक्षरशः तिलांजली दिल्याचे चित्र आहे.अशा परिस्थितीत कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली असून संबंधित विभाग कारवाईची मोहीम केव्हा सुरु करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच “कोरोना ईज़ बॅक” गडचांदूरकर मात्र बेफिकीर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here