चंद्रपूर जिल्ह्यात 16 नवे कोरोनाबाधित ; एक मृत्यू

0
832
Advertisements

चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 294 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 791 झाली आहे. सध्या 108 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख आठ हजार 275 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 83 हजार 172 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये भद्रावती येथील 20 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 395 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 357, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, बल्लारपूर दोन, भद्रावती तीन, सिंदेवाही एक, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here