दुर्गापूर – 29 डिसेंम्बर 2020 ला दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये केसरीनंदन नगर ला राहणाऱ्या पुष्पा यांची 19 वर्षीय मुलगी ईशा ही कुणालाही न सांगता घरून निघून गेली अशी तक्रार प्राप्त झाली होती.
पोलिसांनी मिसिंग रिपोर्ट नोंद करून मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही, कोणताही सुगावा नसतांना त्या मुलीचा शोध घ्यायचा कसा असा पेच दुर्गापूर पोलिसांसमोर निर्माण झाला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी आपला खबरी नेटवर्क ला माहिती देत मुलीचा फोटो दिला.
ठाणेदार धुळे व विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, अशोक मंजुळकर, उमेश वाघमारे, मनोहर जाधव, संतोष आडे, सूरज लाटकर यांनी दिवसरात्र एक करीत त्या मुलीची शोधमोहीम सुरू ठेवली व त्या मुलीबद्दल माहिती मिळवली.
ती मुलगी अजिंठा जिल्हा औरंगाबाद ला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली, विशेष पथक तात्काळ औरंगाबादला रवाना झाले व त्या मुलीला 9 फेब्रुवारीला ताब्यात घेत चंद्रपुरात परत आणले.
सर्व कार्यवाही पूर्ण करीत सुखरूप त्या मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
मिसिंग तक्रारींचे आवाहन, दुर्गापूर पोलिसांनी सोडविले मिसिंग तक्रारींचे कोडे
Advertisements