घुगूस – घुग्घूस येथील शुभम फुटाने हा मागील आळ दिवसांपासून बेपत्ता असून परिस्थिती पाहता त्याचे अपहरण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्या दिशेने पोलिसांनीही तपास सुरु केला आहे. मात्र अद्यापतरी शुभमचा ठाव – ठिकाना पोलिसांना लागलेला नाही. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घूग्घूस येथे फुटाने कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी पोलिस विभागाशी संपर्क साधून तपासाबाबत माहिती जाणून घेतली आहे.
दिलीप फुटाणे हे वेकोलीतील कर्मचारी आहे. त्यांचा 25 वर्षीय अभियांत्रीकी छात्र असलेला मुलका शुभम हा 17 जाणेवारीला बेपत्ता झाला होता. याबाबत घूग्घूस पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल होण्याच्या काही तासातच शुभमच्या वडीलांना खंडणीसाठी अपहरणकर्त्यांचा फोन आला. पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरु केला आहे. मात्र अदयापतरी शुभमचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही. दरम्याण चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज घूग्घूस येथे जाउन शुभमच्या परिवाराची भेट घेतली आहे. यावेळी आ. जोरगेवार यांनी शुभमच्या वडिलांकडून प्रकणाची माहिती जाणून घेतली. आ. जोरगेवार यांनी पोलिस विभागाशी संपर्क साधून तपासाबाबत माहिती जाणून घेतली आहे. शुभमला शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असल्याचे यावेळी पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
7 दिवस लोटले तरी शुभम बेपत्ताचं, आमदार जोरगेवार यांनी घेतली फुटाने परिवाराची भेट
Advertisements