शेतमजुराने केला 2 वर्षीय मुलीवर अत्याचार

0
1504
Advertisements

जिवती – तालुक्यातील शेणगाव येथे 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणात 22 वर्षीय आरोपी आकाश पवार ला अटक करण्यात आली.

आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतावर शेत मजूर म्हणून काम करीत होता, आरोपी पीडितेचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

Advertisements

22 जानेवारी घटनेच्या दिवशी पीडितेच्या वडिलांनी मुलीला नातेवाईकांकडे नेण्यास सांगितले असता आरोपीने ह्याचा फायदा घेत चिमुकलीला घरी न नेता शेतात घेऊन गेला व तिथे त्या चिमुकलिवर अत्याचार केला.

चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची वाच्यता सुद्धा ती करू शकली नाही, यामुळे आरोपीची हिंमत वाढली मात्र दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला मुलीच्या पोटात दुखायला लागले असता तिच्या वडिलांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण करण्यास सांगितले असता पीडितेच्या वडिलांनी घटनेची तक्रार चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनला केली व याबाबत जिवती पोलीस स्टेशनला सूचना दिली आता उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत अवघ्या 10 मिनिटात आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपी आकाश पवार वर पोक्सो व 376 कलम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास जिवती पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here