प्रखर राष्ट्रवाद व देशभक्ती ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या लढाऊ वृत्तीचा परिचय – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

0
109
Advertisements

चंद्रपूर – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती व राष्ट्रवाद हा बलाढ्य असून त्यांनी देशाच्या बाहेरून सुद्धा इंग्रजांना ललकारलं हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचा परिचय आहे असे गौरवोद्गार पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त स्थानिक बाबुपेठ येथील नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्याप्रसंगी केले. News34 Chandrapur

      या प्रसंगी राजू घरोटे, प्रभागातील नरसेवक शाम कनकम, प्रदीप किरमे, कल्पनाताई बगुलकर, पुतळा समितीचे अनिल तुंगीडवार, विवेक पोतनुरवार, श्री ताटपल्लीवार तसेच भाजपचे संदीप आगलावे, गणेश गेडाम, वासू देशमुख, दशरथ सोनकुसरे, राजेश यादव, सागर भगत, साईनाथ उपरे, मुकेश गाडगे, कवडू गुंडावार, अनिल धामनगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. Ex-mp Hansraj Ahir
    बाबुपेठ येथील नेताजी चौक हा प्रमुख चौक असतांना त्याचे सौंदर्यीकरणासोबत नेताजींच्या प्रखर राष्ट्रभक्तीपर जीवनातील काही महत्वपूर्ण क्षणांना नागरिकांसमोर उजाळा मिळावा या मनीषेतून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अशी धुरा खांद्यावर असतांना स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून तैलचित्रा ची कलाकृती रेखाटली व चौकाच्या शिरपेचात सौंदर्यीकरणाचा तुरा रोवला असे हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. पुतळा समितीच्या पुढाकारातून या पुतळ्याची निर्मिती झाली व आज याच पुतळ्याचे सौंदर्यीकरण झाले त्याबद्दल अहीर यांनी पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
    या कलाकृतीमुळे नेताजी चौकाला व नेताजींच्या पुतळ्याला मूर्त स्वरूप मिळाल्याचा आनंद यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here