माणिकगड माईन्स जमीन खरेदी प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी करा

0
186
Advertisements

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे मागील चार दशकापुर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाची माणिकगड सिमेंट कंपनीचे आगमन झाले. सिमेंटसाठी लागणाऱ्या चुनखडीची आवश्यकता असते.याकरीता जिवती तालुक्यातील मौजा कुसुंबी येथील ४२ आदिवासी कुटुंबांचे ६३‌.६२ हे. आर.जमीनी घेण्यात आली.मात्र या गावातील मुळमालक असलेले १४ आदिवासी,कोलाम कुटूंबांच्या शेत जमीनीचा कोणताही मोबदला न देता चुनखडीचे उत्खनन करून त्या आदिवासी बांधवांना बेघर केले.२०१३ पासून ७/१२ वर महसुल अधिकाऱ्यांच्या संगनमताने इतर अधिकारात नियमबाह्य माणिकगड खदान म्हणून उल्लेख करण्यात आल्याने हा वाद गेल्या ७ वर्षांपासून सुरु आहे. तहसीदार,भूमी अभिलेख अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी खदानीत जमीनी असल्याचा उल्लेख अहवालात केला.आदिवासींची फसवणूक झाल्याची बाब उघड झाल्यामुळे तहसीलदार यांनी चालू वर्षात स्पॉट पंचनामा करून आदिवासी शेतकऱ्यांचे पेरे नोंद केले.
नोकारी(बु)येथील ११ आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बनावटी कागदपत्रांच्या आधारे व शासनाची परवानगी नसताना कंपनीने आपली मालकी असल्याचा देखावा केल्याचे बोलले जात असून सोमा भोजी आत्राम या शेतकऱ्याने दाखल केलेल्या प्रकरणावरून महसूल न्यायालयाने माणिकगड कंपनीची मालकी रद्द करून आदीवासींच्या नावे प्रत्यार्पण केल्याने उर्वरित १० लोकांचा देखील असाच वाद आहे.हैद्राबाद संस्थानच्या अधिसुचना,महसुल अभिलेख व वनविभागाची मालकी नसताना कंपनीला दिलेला ताबा,हा व्यवहार संशयित असल्याचे आरोप करण्यात आले आहे.यात अनेक घोळ असल्याने अवैद्य उत्खनन व सार्वजनिक रस्त्यांवर कंपनीचा ताबा,खोटे दस्तावेज तयार करून आदिवासींची झालेली फसवणूक,नोकारी येथील स.नं.१८ ते २५ मध्ये कृषक जमीनीचे वाणिज्य वापर व यामुळे बुडालेला महसूल,ताब्या पेक्षाही अधिक जमीनीचे कंपनीकडून होत असलेला वापर,यामुळे एटीएस मोजमाप करण्यात यावे,सदर प्रकरणाची पोलीस विभागामार्फत चौकशी करून कंपनीवर ऑट्रसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा,कंपनीकडून निर्दोष आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करून वेठीस धरले जात आहे,हे खटले मागे घेण्यात यावे या मागणीचे ७० पानांचे निवेदन गृहमंत्री ना.अनील देशमूख यांना बल्लापूर येथे कार्यकर्ता मेळावा दरम्यान देण्यात आले आहे. News34 Chandrapur
यावेळी जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष तथा राकाँ जेष्ठ नेते सैय्यद आबीद अली,केशव कुळमेथे,शंकर आत्राम, बापूराव जूमनाके,मारोती येडमे,जयराम सिडाम,महादेव कुळमेथे,रामदास मंगाम इत्यादींची शिष्टमंडळात उपस्थिती होती. मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकुन घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,कोरपना तालुका महिला राकाँध्यक्ष बेबीताई उईके,माजी जि.प.सभापती तथा राजूरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष तथा राकाँ कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here