गृहमंत्री देशमुख यांच्या वक्तव्याने पत्रकारही झाले अवाक

0
1143
Advertisements

चंद्रपूर : स्थानिक अपक्ष आमदारांनी चंद्रपुरात सात गाड्या अवैध दारू पकडून दिल्यानंतरही राज्याच्या गृहमंत्र्यांना अवैध दारु तस्करीची ‘स्पेसिफिक केस’ हवी आहे. चंद्रपुरात आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावली. रात्री 9 वाजता त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बातचित करताना त्यांना सहाजिकच दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी सात अवैध दारूच्या गाड्या पकडल्याचे लक्षात आणून दिले. ही कारवाई करताना पोलिस अधिकाऱ्यांनी आमदारांशी उर्मट संवाद केल्याचेही सांगितले. त्यावर बोलताना गृहमंत्र्यांनी ‘स्पेसिफिक केस’ द्या, असे पत्रकारांना सांगितले व आमदार जोरगेवार यांची लेखी तक्रार मिळाल्याचेही कबूल केले. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. या पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी सरकार किती संवेदनशील आहे, हे या विधानाने दिसून आले आहे. कालच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आमदारांशी उर्मट संवाद केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकारी शिरजोर तर लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चंद्रपूरच्या घटनेने सिद्ध केले आहे.

गृहमंत्री देशमुख यांच्या या वक्तव्याने पत्रकारही काही क्षणासाठी अवाक झाले होते, खुद्द गृहमंत्री पत्रकारांना प्रकरण मागतात म्हणजे, दारूची इतकी मोठी कारवाई झाल्यानंतर सुद्धा त्यांना प्रकरण हवंच म्हणजे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्याचा पाठिंबा दिसत आहे.

Advertisements

आता सरळ सिद्ध झाले की चंद्रपूर जिल्हा हा अवैध धंदे करणाऱ्यांसाठी सेफ झोन आहे, सध्या अमित अवैध दारू विक्रेता याच काम गेल्यावर चिंटू-विशाल ची जोडी शहरात दारूच्या व्यवसायात धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here