चंद्रपूर – पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ , पत्रकारांनी आपल्या लेखणीने, वाणीने समाज प्रबोधन करून समाजातील अनिष्ठ प्रथांवर कठोर भाषेत आसुढ ओढायला पाहिजे, पत्रकार म्हणजे ज्ञानी, अभ्यासू, समाजाप्रती आस्था बाळगणारा जबाबदार घटक आहे मात्र आता हे पत्रकार ढासळले आहे.
आधी सामाजिक प्रश्न पोट तिडखीने मांडून सरकारला धारेवर धरायचे हे पत्रकारितेचे रूप नागरिकांनी बघितले आहे.
आधी जाहिराती प्रसार माध्यमांच्या कमाईचे साधन होते आता चक्क बातम्या विकल्या जात आहे, बेजबाबदार समाज घडविण्याचे काम 95% भ्रष्ट दलाल मीडिया करीत आहे याचेच जिवंत उदाहरण म्हणजे अर्णब गोस्वामी सारखे पत्रकार.
काय याचा अभ्यास, बुद्धीमत्ता, मानसिक संतुलन, आवाजाची मर्यादा काय सगळ्या भूतलावरचे ज्ञान ह्या गोस्वामीजवळ आहे. Arnab Goswami
टीआरपी च्या नादात ह्या गोस्वामीने देशाच्या अतिशय संवेदनशील माहिती इतरांसोबत सार्वजनिक केली, मात्र केंद्र सरकारच्या अभयामुळे हा पत्रकारितेमधील कोरोना वाचलेला आहे. अर्णब गोस्वामीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर शहर कांग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. Chandrapur city Congress
अर्णब गोस्वामी सारखा माणूस चौथ्या स्तंभाला काळिमा फासणारा आहे, अर्णब चे वर्तन ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट चा भंग करणारा आहे, त्यामुळे देशद्रोही अर्णब ला तात्काळ अटक झाली पाहिजे यासाठी शहर काँग्रेस कडून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेश महिला काँग्रेस सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस चे अध्यक्ष रामूभैया तिवारी, युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव कादर शेख, इरफान शेख, शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुनीता ताई अग्रवाल, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, महिला काँग्रेस उपाध्यक्षा एकता गुरले उपस्थित होते.