चंद्रपूर – जिल्ह्यात वर्षभरापासून अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून सध्या अवैध दारूचा महापूर वाढलेला दिसत आहे.
2 दिवसांपूर्वी चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कोट्यवधी रुपयांची दारू पकडली त्यानंतर याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना त्याबाबत सांगितले असता त्यांनी ते माझं काम नाही, व माझा अधिकार क्षेत्र नाही तुम्ही स्थानिक पोलिसांना याबाबत सांगावे असे म्हणाले असता एक जबाबदार पोलीस अधिकारी असं उत्तर कसे काय देऊ शकतात यावर सध्या पक्ष व पोलीस मध्ये घमासान सुरू झाले.
महाविकास आघाडी सहित मनसे, आम आदमी पार्टी, यंग चांदा ब्रिगेड, आरपीआय यांनी एकत्र येत जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांची भेट घेत पोलीस निरीक्षक खाडे यांचं निलंबन करावे अशी मागणी केली.
जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले मात्र पोलीस कारवाई करणे टाळत आहे असा आरोप सर्व पक्षीयांनी केला आहे, अवैध धंद्याबाबतीत चंद्रपूर जिल्हा हा बदनाम झाला असल्याची माहिती सर्व पक्षीयांनी जिल्हा पोलिस अधिक्षकासमोर मांडली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, माजी शहर कांग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष राजीव कक्कड, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, आम आदमी पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष सुनील मुसळे, खोरीपा चे प्रवीण खोब्रागडे व यंग चांदा ब्रिगेडचे बलराम दोडानी, कलाकार मल्लारप उपस्थित होते.
आमदारांनी दारू पकडल्यावर खाडे यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला मात्र यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा हस्तक्षेप करू शकत नव्हती कारण ती कारवाई व क्षेत्र पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने खाडे यांनी घटनास्थळी येणं हे आवश्यक नव्हते असा कायदा आहे.
स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात कुठेही कारवाई करू शकतो मात्र कारवाई केल्यावर त्याची संपूर्ण माहिती व कारवाईचे अधिकार स्थानिक पोलीस स्टेशनला असते.
22 जानेवारीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपुरात येत असून आमदार जोरगेवार व महाविकास आघाडी मिळून गृहमंत्री देशमुख यांचेकडे पोलीस निरीक्षक खाडे यांची तक्रार करणार आहे.