निष्ठुर शासनाच्या विरोधात कोविड योध्याचं भीक मांगो आंदोलन

0
263
Advertisements

चंद्रपूर –  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांचे मागील ६ महिन्यांपासून पगार थकीत आहेत.तसेच वैद्यकीय महाविद्यालयात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांनी मार्च २०१९ मध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर त्यांना शासनाने किमान वेतन मंजूर केले होते. परंतु तात्कालीन अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्यामुळे कामगारांना मागील दोन वर्षापासून किमान वेतन लागू झालेले नाही. डॉ. मोरे यांच्याविरुद्ध जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तीन वेळा कारवाई प्रस्तावित करूनही त्यांच्याविरुद्ध वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे ५०० कंत्राटी कामगारांना मागील दोन वर्षापासून लागू झालेले किमान वेतन मिळत नसल्याने तसेच सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे.  The covid warrior’s begging movement in chandrapur कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी जन विकास कामगार संघाने अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रशासनाच्या सर्वच पातळीवर अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळालेला नाही.

त्यामुळे जन विकास कामगार संघाने आता आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. ६ महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा तसेच दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले किमान वेतन तातडीने लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी 21 जानेवारीला गांधी चौकात भीक मांगो आंदोलनाची सुरुवात केली, विशेष म्हणजे सर्व कंत्राटी कामगारांनी एक दिवस काम बंद करीत या आंदोलनात सहभागी झाले. News34 Chandrapur

Advertisements

किमान वेतन सुद्धा या कंत्राटी कामगारांना देण्याचे ठरले होते मात्र शासनाच्या अधीन असलेले अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केले, महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री फक्त आश्वासने देत असून कामगारांच्या थकीत वेतनावर गंभीर नसल्याचे दिसून आले, 7 दिवसांच्या आत जर कामगारांचे थकीत वेतन मिळाले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी शासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here