चंद्रपूर – देशातील एकेकाळी अग्रगण्य असणारी सहारा इंडिया कंपनीत लाखो नागरिकांनी गुंतवणूक केली होती मात्र सेबीच्या कारवाईनंतर सेबीद्वारे सहारा इंडियाची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश दिले. Sahara India Pariwar
मात्र त्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी सहारा इंडिया तर्फे एजंट नेमून ग्राहकांकडून पैसे गुंतवणूक करण्याचे काम सुरू आहे मात्र नागरिकांच्या गुंतवणूक केलेल्या पैश्याची अवधी संपली असता ते देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे.
चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील कार्यालयात अनेक नागरिकांचे पैसे अडकले आहे मात्र ते पैसे मिळावे यासाठी नागरिक अनेक महिन्यापासून कार्यालयात चकरा मारताना दिसतात. Shivsena Chandrapur
सरस्वती बोईनवार या वृद्ध महिलेच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे मागितले असता ते पैसे त्यांना मिळत नव्हते यासाठी त्यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची भेट घेत आपबीती सांगितली. News34 Chandrapur
प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते विक्रांत सहारे, राहुल विरुटकर व पवन नगराळे सहारा इंडिया कार्यालयात पोहचले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर उपस्थित एकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप देत कार्यालयाची नासधूस करीत तात्काळ त्या वृद्ध महिलेचे पैसे परत करण्यास सांगितले.
जिल्ह्यात आजही अश्या अनेक कंपन्या नागरिकांना लुबाडण्याचे काम करीत आहे, ज्यांना याबद्दल काही त्रास असल्यास त्यांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी केलं आहे.