अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गेटसमोर कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

0
726
Advertisements

कोरपना:- कोरपना तालुक्यात मोठ्या रुबाबात देशभर नावाजलेल्या सिमेंट कंपणी आहेत त्यात आवरपूर सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक येथील कंत्राती कामगारांच्या मागण्या संदर्भात आक्रोश अनावर झाला आणि आज सकाळपासून त्यांनी नांदा फाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपणीच्या गेट समोर ठिया मांडला त्यामुळे वाहतुकीची व्यवस्था कोलमडली. VIjaykranti

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत अनेक वर्षांपासून कांग्रेसचे माजी खासदार कामगार नेते नरेश पुगलिया यांचे वर्चस्व आहे, त्यांच्या वर्चस्वाच्या गडाला पालकमंत्री वडेट्टीवार यांची विजयक्रांती कामगार संघटना सुरुंग लावीत असून वडेट्टीवार यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी समोर आले असून जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय व्हायला नको अशी भूमिका त्यांच्या संघटनेने घेतली आहे. Ultra tech cement factory awarpur

Advertisements

आंदोलन परिसरात तब्बल 1 हजार कामगार एकटवले असून परिस्थिती चिघळू नये यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशन चे उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात मोठा पोलिसांचा बंदोबस्त दिसत आहे. News34 Chandrapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here