मुख्याध्यापकांची बिट स्तरीय सभा

0
301
Advertisements

चिमूर –  दि.१०/१२/२०२० ला जि.प.उ.प्रा.आदर्श विद्यालय हिरापूर येथे बीटस्तरीय मुख्याध्यापक यांची सभा आयोजित केली होती, या सभेला मार्गदर्शक म्हणून
श्री.किशोरजी पिसे विस्तार अधिकारी बीट शंकरपूर पंचायत समिती चिमूर,श्री.अशोक गायकवाड केंद्र प्रमुख हिरापूर,श्री.दादाजी परचाके केंद्र प्रमुख साठगाव, श्री.काकडे सर मोबाईल शिक्षक,सौ.वरचे ताई विषयतज्ञ श्री.संजय पंधरे विषयतज्ञ इत्यादीनी मार्गदर्शन केलेत.
या बीटस्तरीय मुख्याध्यापक सभेमध्ये शंकरपूर बीटातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते, या सभेमध्ये
१)स्वाध्याय उपक्रम,पटसंख्या/स्वाध्याय सोडविले विध्यार्थी.
२)गोष्टींचा शनिवार,
३)मिशन मॅथेमॅटिक- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचा उपक्रम.
४)शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय परीक्षेला ७५% विद्यार्थी बसविणे.
५)मैत्री करूया विज्ञान गणिताशी.
६)नुट्री गार्डन तयार करणे.
७)आवश्यक वर्ग खोल्या मागणी नोंदवावी,गट शिक्षण अधिकारी यांच्या नावे अर्ज साजरा करावा.इत्यादीं विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
आदर्श शाळा बनविण्यासाठी अशोक गायकवाड मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख हिरापूर तसेच मा.गट शिक्षण अधिकारी किशोर पिसे यांच्या मार्गदर्शनात, आदर्श शाळा करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श विद्यालय हिरापूर येथील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न मुख्याध्यापक श्री.अशोक गायकवाड यांचा सुरू आहे,तसेच हिरापूर केंद्र अंतर्गत येणाऱ्या २१ शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणार यांच्यासाठी केंद्र प्रमुख या नात्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना कसे अध्यापन केले यापेक्षा विध्यार्थी शिकत आहे किंवा नाही हे माझे प्रथम कर्तव्य आहे,व केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व २१शाळेमध्ये गुणवत्ता तपासणी करणार आहेत असे केंद्रप्रमुख श्री.अशोक गायकवाड यांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here