Advertisements
राजुरा – शहरातील राजीव गांधी चौकात स्थित रमेश झंवर यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी 29 नोव्हेम्बरच्या रात्री घरी प्रवेश करीत सोने व चांदीचे दागिने, सोन्याचे बिस्कीट, चेन व दागिने, रोख 7 हजार रुपयांच्या रकमेवर असा एकूण 3 लाख 49 हजारांच्या मालावर डल्ला मारला.
लग्नानिमित्य रमेश झंवर हे नागपूरला गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरांनी डाव साधला, या संबंधी झंवर यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून राजुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.