वडेट्टीवारांचा तो दावा “खोटा”

0
1942
Advertisements

चंद्रपूर – दारुबंदीच्या मुद्द्यावरून डॉ. अभय बंग व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आमोरासमोर आले आहे.
विषारी दारूमुळे अनेक नागरिक दारूबंदी जिल्ह्यात मृत्युमुखी पडत आहे, मात्र सरकारी दारूने एकाचाही मृत्यू होत नाही असा दावा मंत्री वडेट्टीवार व आमदार धर्मराव बाबा आत्राम करीत आहे.
मात्र त्या दोघांचे दावे फोल असल्याचं डॉ. अभय बंग यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपासून मंत्री वडेट्टीवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यासाठी धडपड करीत आहे, विषारी दारूमुळे मृत्युदर वाढत आहे असा दावा वडेट्टीवार करीत आहे.
सर्च फाऊंडेशन मध्ये दरवर्षी जन्म-मृत्यूची नोंद होत असते, मात्र मृत्युदर वाढला अस कुठेही दिसत नाही, पोलीस विभागाने स्वतः गेल्या 5 वर्षात विषारी दारूमुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे लेखी पत्र सुद्धा डॉ. बंग यांना दिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी ही परिणामकारक असून दारूबंदी उठविण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये अशी मागणी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे डॉ. अभय बंग यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here