राजकीय वर्तुळात खळबळ नगराध्यक्षासह 20 नगरसेवक अपात्र

0
825
Advertisements

नागपूर – काटोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सहित 20 नगरसेवकांना अपात्र करण्यात आल्याने काटोल येथे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुंठेवारी प्रकरणी नगराध्यक्ष तथा आरक्षित जागेवर घरकुलांचे नियमबाह्य व निकृष्ठ बांधकाम प्रकरणी 20 नगरसेवक अपात्र झाले.
बांधकामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना काम देणे पुढाऱ्यांना चांगलेच भोवले अपात्रतेची कारवाई नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने करण्यात आली.
अपात्र करण्यात आलेले नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर, यांचेसह सुभाष कोठे, माया शेरकर, मीरा उमप, श्वेता डोंगरे, किशोर गाढवे, शालिनी बनसोड, राजू चरडे, लता कडु, संगीता हरजाल, सुकुमार घोडे, वनिता रेवतकर, देविदास कंठाने, शालिनी महाजन, प्रसन्न श्रीपतवार, जयश्री भुरसे, मनोज पेंदाम, या नगरसेवकासह स्वीकृत नगरसेवक हेमराज रेवतकर व तानाजी धोटे यांचा समावेश आहे.
काटोल नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या 23 असून चरणसिंग ठाकूर यांच्या विदर्भ माझाचे 18 सदस्य, शेतकरी कामगार पक्ष 4, भाजप 1 असे एकूण सदस्य संख्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here