कुसळ येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

0
225
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा,राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या युवकांतर्फे कोरपना तालुक्यातील कुसळ येथील सर्वधर्मसमभावचे प्रतीक मानले जाणारे “हज़रत दुल्हनशाह वली बाबा” यांच्या दर्गाह परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आला. लॉकडाऊनमुळे याठिकाणी केरकचरा,प्लास्टिक जमा झालेला होता.प्लास्टिकमुळे मृदा प्रदूषण व इतर होणारी हानी लक्षात घेऊन युवकांनी सदर उपक्रम राबविला.सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून यासाठी पथकाचे स्वयंसेवक प्रतीक डाखरे, शाहीद शेख, एन.एस.एस.ओ. संघटना युवक कोरपना तालुका अध्यक्ष अफ़रोज शेख, दर्ग्याचे खादीम मोहम्मद आसीफ, मकसूद खान,ताहेर शेख,कुणाल जगताप,अयान शेख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here