4 मृत्यूसह चंद्रपूर जिल्ह्यात 152 नवे बाधित

0
417
Advertisements

चंद्रपूर  : जिल्ह्यात मागील 24 तासात 147 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 152 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 607 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 382 झाली आहे. सध्या एक हजार 911 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 53 हजार 938 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 31 हजार 107 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

Advertisements

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक येथील 69 वर्षीय पुरूष, तुकुम येथील 62 वर्षीय महिला, गुरूनगर भद्रावती येथील 81 वर्षीय पुरूष व मोतारा येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 314 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 291, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 152 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 52, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर तालुक्यातील नऊ, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 12, नागभिड तीन, सिंदेवाही एक, मुल सात, सावली एक, राजुरा चार, चिमुर 16, वरोरा 15, कोरपना तीन, व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here