कोंढा फाट्यावर दुचाकीचा भीषण अपघात

0
2723
Advertisements

भद्रावती/अब्बास अजानी

येथून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या कोंढा फाट्यावर माजरीकडून येणा-या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने १ जण जागीच ठार,तर १ जण गंभीर जखमी होण्याची घटना दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार,माजरी येथील अब्दुल वहाब (५०) व दीपक गुप्ता(३१) हे दोन इसम पॅशन मोटरसायकल क्र.एम.एच.३४,बी.के.१९५७ ने माजरीवरुन भद्रावतीला येत होते.दरम्यान,कोंढा फाट्यावर भद्रावतीकडे वळताच चंद्रपूरकडून नागपूरकडे भरधाव जाणा-या अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.त्यात अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले.तर दीपक गुप्ता हे गंभीर जखमी झाले.त्यांना लगेच येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here