चंद्रपूर – 26 नोव्हेंबर संविधान दिनी संवैधानिक हक्कांसाठी ओबीसी बांधवांच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी महामोर्चा ओबीसी जनगणना समनव्य समिती तर्फे काढण्यात आला.
मात्र दुसऱ्याच दिवशी आयोजन समितीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
कारण मोर्चा काढण्यासाठी पोलिसांची परवानगी नसल्यामुळे 25 नोव्हेम्बरला आयोजन समितीला पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावले मात्र मोर्चा हा नियोजित दिवशी निघणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते.
महामोर्च्यात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सामील झाले होते, समारोपीय कार्यक्रमात मंचावर आयोजन समितीच्या सदस्यांनी ओबीसी बांधवांचे हक्क व स्वतंत्र जनगणनेचे महत्व व आपले अधिकार यावर मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात नागरिकांमध्ये पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार व आमदार प्रतिभा धानोरकर बसले होते.
स्वतःहून लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये बसले होते की त्यांना आधी कळाले की आयोजन समितीवर गुन्हे दाखल होणार आहे? राज्याचे मंत्री, एकमेव खासदार आमदार उपस्थित असतांना सुद्धा गुन्हा दाखल झालाच तरी कसा यावर गूढ कायम आहे.
लोकप्रतिनिधी जरी नागरिकांमध्ये बसले असले तरी त्यांनी शेवटच्या क्षणी समारोपीय कार्यक्रम मात्र हायजॅक केला.
आयोजन कुणाचे आणि प्रसिद्धी कुणाला, हे प्रसार माध्यमांनी प्रसारित करून दाखविले.
आयोजन कुणाचे आणि प्रसिद्धी कुणाला?
Advertisements