गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त सम्पर्क प्रमुख रूग्ण मित्र गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथे आढावा बैठक पारपडली.यात विविध पक्षांच्या तरूणांसह शेतकऱ्यांनी प्रवेश घेतला.ना.बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पक्ष बांधणी व पक्ष विस्तार संदर्भात रुग्ण मित्र गजू कुबडे यांना चंद्रपूर गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्त करण्यात आले.
चिमुर,सिंदेवाही,ब्रम्हपूरी,नागभीड, चंद्रपुर, बल्लरशाह, गोंडपीरी,राजूरा तालुक्याचा दौरा आटपून गडचांदूर येथे कोरपना जिवती तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. कुबडे यांच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन मार्गदर्शन करताना कुबडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.सतीश बिडकर, पंकज माणूसमारे,शैलेश विरुटकर,सागर गुड्डेलीवर,गणेश ठावरी,जीवन तोगरे, अफ़रोज़ अली,पारस सागोले,सुभाष राजूरकर,मारोती राजूरकर,सतीश महात्मे, अरविंद वाघमारेसह इतरांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज माणूसमारे,गणेश,बाबू यांनी परिश्रम घेतले.
———–//———
ना.बच्चू कडू यांना डोळ्यापुढे ठेवून युवक,शेतकरी,महिला वर्गांनी सेवा बंधन बांधून समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने प्रहार मध्ये सामिल होण्याचे आवाहन प्रहार सेवक सतीश बिडकर यांनी यानिमित्ताने केल आहे.
————-//———-
गडचांदूर येथे रुग्ण सेवक गजू कुबडेंची आढावा बैठक
Advertisements