वरोरा – मानसिक तणावात गेलेल्या डॉ. शीतल आमटे यांचा मृतदेह 30 नोव्हेंबरला आनंदवन वरोराला आढळल्याने सामाजिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.
शीतल आमटे यांच्या मृत्यूचे कारण काय यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
नागपूर वरून आलेल्या फॉरेन्सिक टीम ने शितल आमटे यांच्या घरून 2 मोबाईल, लॅपटॉप व टॅब जप्त केले, सोबतच औषधी व 1 इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले मात्र मिळालेले इंजेक्शन हे इन्सुलिन असल्याची माहिती मिळाली आहे.
लॅपटॉपला पासवर्ड असल्याने फॉरेन्सिक टीमने त्यामधील असलेली माहिती मिळावी यासाठी लॅपटॉप नागपूरला नेण्यात आला आहे.
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चाना उधाण आले होते मात्र पोलिसांच्या अहवालाने सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला.
डॉ. शीतल आमटे ह्या मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या मात्र त्या अचानक इतके मोठे पाऊल उचलणार अस कुणालाही वाटलं नाही.
पोलिसांनी शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांचं बयांन नोंद केले आहे. त्यांनी आपल्या बयानात 30 तारखेला काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे, सकाळच्या सुमारास शीतल आमटे यांचे सासरे व सासू या कोविड टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते त्यावेळेस शीतल आमटे यांनी सासू-सासऱ्यांना मास्क लावण्याचा सल्ला देत बाहेर आल्या होत्या, त्यांचे पती गौतम करजगी हे काही कामानिमित्त बाहेर गेले व त्यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता.
काही वेळानंतर गौतम करजगी हे परत आले त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता, त्यांनी खिडकीतून बघितले असता शीतल आमटे या स्तब्धपणे खुर्चीवर बसल्या होत्या, मात्र दरवाजा उघडत नसल्याने गौतम करजगी यांनी दरवाजा खोलून आत शिरले मात्र डॉ. शीतल यांच्या शरीरात काही हालचाल होत नव्हती, त्यांनी कृत्रिम श्वास सुद्धा दिला असता त्यांच्या तोंडून पाणी निघाले लगेच त्यांनी डॉक्टरला पाचारण केले मात्र डॉक्टरांनी शीतल आमटे यांना मृत घोषित केले.
आमटे कुटुंबियांचे बयाण 1 ते 2 दिवसात होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रसिद्ध असलेलं आमटे कुटुंबीयांच आनंदवन ज्यामध्ये कृष्ठरोग्यांची सेवा केली जाते, त्यामध्ये डॉ. विकास आमटे यांनी मुलगी डॉ. शीतल आमटे यांच अचानकपणे निधन झाल्यानंतर जिल्ह्यातील एकाही राजकीय पक्ष प्रतिनिधी/आमदार, खासदार, मंत्री यांनी साधी आमटे कुटुंबियांची भेट घेतली नाही.
1 डिसेंम्बरला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वतः आनंदवन येथे जाऊन आमटे कुटुंबियांच सांत्वन केल.
2 डिसेंबर ला सायंकाळी शवविच्छेदन अहवाल येण्याची शक्यता आहे, त्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळणार असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे