अडीच फूट उंचीच्या दिव्यांग पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क

0
195
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.याच श्रेणीत गडचांदूर येथेही अनेक पदवीधर मतदारांनी मतदान केले.येथील महात्मा गांधी विद्यालय बूथ क्रमांक 237 वर एका अडीच फूट उंचीच्या जागृत दिव्यांग पदवीधर “दिनेश पडवेकर” वयवर्ष 35 यांनीही मोठ्या उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारपडलेल्या सदर निवडणूक प्रक्रियेत शासन नियमांची चोखपणे अंमलबजावणी करण्यात आली.सोशल डिस्टंसिंग,मास्क,सॅनिटायजर या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले.मतदाना नंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here