अनेक पदवीधर मतदानापासून वंचित

0
297
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया शांततेत पारपडली.मात्र यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसला.मतदानापासून अनेक पदवीधर मतदारांना वंचित राहावे लागले.याबाबत राजूरा विधानसभाचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रशासनाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती असून मतदारांच्या रांगा पाहून आमदार धोटे यांनी दुपारीच जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.तक्रारीनंतर गडचांदूर व राजूरा या दोन्ही मतदान केंद्रावर अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्वतः भेट दिल्यानंतरही मतदान प्रक्रियेचा वेग वाढविण्यात यश आले नाही. पदवीधरांची मोजकी संख्या असतानाही प्रशासनाला मतदारांची गैरसोय टाळता आली नसल्याची खंत आमदार धोटे यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे गडचांदूर येथे जिवती व कोरपना या दोन तालुक्याचे मतदान केंद्र असल्यामुळे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागणे सुरू झाले होते.लवकर मतदान आटोपून गावी परत जाण्याच्या हेतूने अनेक मतदार याठिकाणी आले.मात्र संथ गतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेमुळे अनेकांनी मतदानाच्या रांगा पाहून माघार घेऊन गावाकडे जाणेच पसंत केले.यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त करत आमदार धोटेंनी जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here