लग्न समारंभ आटोपून येत असताना नवविवाहित जोडप्यांच्या वाहनाचा भीषण अपघात

0
2723
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – शहरातील घुगूस-वणी मार्गावरील असलेलं रेल्वे गेट दर अर्ध्या तासाला बंद होत असल्याने या मार्गावरील वाहतूकीची समस्या वाढत आहे.
या मार्गावर उड्डाणपूलाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे मात्र ती मागणी फक्त प्रसिद्धीसाठीचं होती.
1 डिसेंम्बरला चंद्रपूर शहरातील लालपेठ येथील काटकर कुटुंबातील राहुल काटकर यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील प्राजक्ता दुर्गे यांचा विवाह समारोह होता.
लग्न समारंभ आटोपून काटकर कुटुंबीय नववधूला चंद्रपूर मध्ये परत असताना घुगूस येथील रेल्वेगेट जवळ वर वधू यांच्या वाहनाचा अपघात झाला.
रेल्वेगेट नेहमीप्रमाणे बंद होता, वाहनचालक सुसाट वाहन चालवीत असल्याने समोर उभे असलेल्या ट्रकवर नवविवाहितांच वाहन आदळले.
या अपघातात वृद्ध महिला, वधू सोबत आलेली युवती आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले.
सुदैवाने राहुल व प्राजक्ता या विवाहित जोडप्यांना कसलीही दुखापत झाली नाही.
जखमींना राजीवरतन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here