दारु तस्कराकडून ३ लाखाचा मुद्देमाल जप्त, भद्रावती पोलिसांची कारवाई

0
498
Advertisements

भद्रावती/अब्बास आजानी

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ३ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक निसाना कंपनीची काळ्या रंगाची स्काॅला कार क्र.एम.एच.१४,डी.टी.५४५३ ने एक इसम नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चंद्रपूरच्या दिशेने दारुची अवैध वाहतूक करीत आहे.अशी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी लगेच सुमठाना चौकात नाकाबंदी करुन सदर कारची झडती घेतली असता त्या कारमध्ये ९० मि.लि.मापाच्या राॅकेट संत्रा देशी दारुने भरलेल्या ६५ हजार रुपये किंमतीच्या ६५० निपा आढळून आल्या. तसेच ३०० रुपये प्रति निप किंमत असलेल्या १८०मि.लि. मापाच्या २१ हजार रुपये किंमतीच्या स्टेरींग रिझर्व बी-७ कंपनीच्या ७० निपा आढळून आल्या. अशा प्रकारे ८६ हजाराची दारु आणि दारुची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ३ लाखाची कार असा एकूण ३ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालक आकाश महादेव खंडाळकर (२७) रा.भद्रनाग वार्ड,भद्रावती यास अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलिस शिपाई केशव चिटगिरे, शशांक बदामवार, निकेश ढेंगे, रोहित चिटगिरे, चालक सहा.फौजदार दिलीप लभाने यांनी केली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here