त्या ब्लास्टिंगणे चक्क शेतातीलचं विहीर खचली

0
409
Advertisements

राजुरा – गोवरी वेकोलीच्या शक्तिशाली ब्लास्टिंगने राजुरा तालुक्यातील निंबाळा येथील शेतकरी विठ्ठल हरी पाल यांच्या शेतातील विहीर खचल्याने ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणींचे जाळे विणले आहे.शक्तिशाली ब्लास्टिंगने अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.यापूर्वी ब्लास्टिंगने अनेकदा जीवघेण्या घटना घडल्या आहेत.सोमवारी सकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यातील निंबाळा येथील शेतकरी विठ्ठल पाल यांच्या शेतातील ३० फूट खोल असलेली विहीर वेकोलीच्या शक्तिशाली ब्लास्टिंगने खचली आहे.त्यामुळे विठ्ठल पाल यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सध्या पिकांचा रब्बी हंगाम सुरू झाला आहे.शेतात पिकांसाठी पाणी देण्याची आवश्यकता असताना अचानक सोमवारी ब्लास्टिंगने विठ्ठल पाल यांच्या शेतातील विहीर खचल्याने त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here