Advertisements
चिमूर – ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफारीचा आनंद घेण्यासाठी नागपूरचे पर्यटक चिमूर मार्गे येत असताना मासळ मार्गावर चारचाकी वाहन क्र. एमएच 49 केबी 2489 नियंत्रण सुटल्याने तुकूम फाटा पुलावर त्या वाहनाचा अपघात झाला.
वाहनामधील 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
सदर वाहन हे महिला चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे.
मृतकाचे नाव सना अग्रवाल असल्याचे समजते, जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.