Advertisements
चंद्रपूर – नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून दुपारी 12 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 18.94% मतदान झाले.
मागील 40 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला पदवीधर मतदार संघाला यंदा सुरुंग लागणार की भाजप आपला किल्ला शाबूत ठेवणार हे मतमोजणीच्या दिवशी कळेलच.
लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सकाळी जुबली हायस्कूल शाळेत मतदानाचा हक्क बजावला, पदवीधर मतदार हा सुशिक्षित व सुज्ञ मतदार आहे राज्यातील असंतोषाला बघून तो पुन्हा भाजपला पहिल्या पसंतीचा क्रमांक देणार असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.