त्या’ वादग्रस्त प्राचार्याची जिल्हाधिका-यांकडे तक्रार

0
523
Advertisements

भद्रावती/अब्बास अजानी

येथील आयुध निर्माणी हायस्कुलचे वादग्रस्त प्राचार्य एम.रंगा राजू यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची शासकीय सुट्टी असताना शाळेला सुट्टी न दिल्याने त्यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
अखिल भारतीय आयुध निर्माणी शिक्षक संघाच्या भद्रावती शाखेचे अध्यक्ष किशोर पावडे यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिका-यांकडे पाठविलेल्या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की,आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम.रंगा राजू यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची राजपत्रित सुट्टी असताना सर्व शिक्षकांना सक्तीने शाळेत बोलावून शाळा भरविली.गुरुनानक जयंती ही डी.ओ.पी.टी.च्या दि.१८ जून २०१९ च्या आॅफीस मेमोरॅंडमनुसार राजपत्रित सुट्टी असून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसुचनेप्रमाणे सार्वजनिक सुट्टी जाहिर केलेली आहे.असे असतानासुद्धा या सर्व शासकीय आदेशांचा भंग करुन शिक्षकांना नाहक मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्य एम.रंगा राजू यांनी सक्तीने व १०० टक्के शिक्षकांना उपस्थित ठेवून शाळा भरविली आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीसुद्धा सदर प्राचार्यांनी राजपत्रित सुट्ट्या, शिक्षण विभाग आणि जिल्हाधिका-यांनी जाहिर केलेल्या सुट्ट्या स्वमर्जीने रद्द केल्या आहेत.त्यामुळे सदर प्राचार्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी अखिल भारतीय आयुध निर्माणी शिक्षक संघाच्या वतीने किशोर पावडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा,शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक चंद्रपूर आणि गट शिक्षणाधिकारी पं.स.भद्रावती यांना पाठविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच प्राचार्यांच्या विरोधात २८ शिक्षकांनी पोलिस स्टेशनला तक्रार करुन एका पत्रपरिषदेतून प्राचार्य एम.रंगा राजू यांच्यावर शिक्षकांचा विनाकारण मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करुन वरीषठांकडे न्यायाची मागणी केली होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here