जिल्ह्यातील विरुर-गाडेगाव परिसरात सर्रासपणे भरतो झेंडी मुंडी व कोंबडा बाजार

0
1264
Advertisements

 

प्रतिनिधी/गणेश लोंढे

कोरपना – समाजामध्ये होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस विभाग डोळ्यावर पट्टी बांधून गुन्हेगारांना मूकसमती देत असल्यामुळे गडचांदूर परिक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांनी तोंडवर काढले आहे.
दरम्यान पोलीस काहीच करीत नसल्याने सामाजिक जाण असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात चळवळ उभी केली.
दरम्यान पोलिसांना कर्तव्याची जाणं झाली आणि विरुर-गाडेगाव परिसरात कोंबड बाजारावर थातुरमातुर कारवाई केली.
मात्र या कारवाईसाठी पोलिसांनी आजपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधली होती काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोठ्या प्रमाणात खुले आम चालणाऱ्या कोंबडा बाजारामुळे विरुर परिसरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे शेजारील असलेल्या तेलंगणा आणि वणी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जुगारी सहभागी होत आहे.
मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
विरुर-गाडेगाव येथे भरणाऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल होते आहे, असे असतानाही पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत केवळ 21 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे तर मंगळवारी भरणाऱ्या बाजाराकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कारवाईत अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तेलंगणा, वणी आणि शेजारील तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जुगारी बाजारात येत असतांनाही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
त्यातच कोरोना काळ असल्यामुळे ना मास्क, ना सोशल डिस्टनसिंग सर्व काही खुल्लम खुल्ला कोंबडा बाजार खेळवल्या जात आहे त्यामुळे याला ठाणेदारांचा आशीर्वाद तर नाही ना अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Advertisements

गडचांदुरात नव्याने आलेले पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक ही आपली नायकगिरी कधी दाखविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here