महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत दुजाभाव !

0
465
Advertisements

चंद्रपूर – 1 डिसेंम्बरला पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपला दमखम दाखवून दिला.
पदवीधर मतदार संघ अनेक वर्षांपासून भाजपचा गड राहिला आहे, मात्र यंदा त्या गडाला सुरुंग लावणार की गड शाबूत राहणार या प्रश्नाचे उत्तर निकाल येईपर्यंत कुणालाही कळणार नाही.
सध्या भाजपतर्फे नागपूरचे महापौर संदीप जोशी, कांग्रेसतर्फे अभिजित वंजारी, विदर्भवादी नितीन रोंघे, समाज माध्यमावरील स्टार खदखद कराळे, मानवाधिकार पार्टीच्या सुनीता पाटील असे 19 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा मार्ग सध्या खडतर असल्याचे दिसून येत आहे.
कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाचा वंजारी यांना पाठिंबा असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र हे चित्रच उलट आहे.
अनेक प्रचार कार्यक्रमात महाविकास आघाडीमधील घटक पक्षाला साधं बोलावणं सुद्धा कांग्रेसतर्फे करण्यात आले नाही, प्रचार, कार्यकर्ता बैठकीच्या पत्रिका छापण्यात आल्या मात्र कांग्रेस शिवाय त्या पत्रिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेला स्थान मिळाले नाही यावर घटकपक्ष नाराज असल्याचे चित्र आहे.
गडचांदूर शहरातील प्रचार कार्यक्रमाच्या पत्रिका छापण्यात आल्या मात्र त्या पत्रिकेत कांग्रेसच्या नेत्यांची नावे, शिवसेना व राष्ट्रवादी मधील एकाही नेत्यांचे नाव त्या पत्रिकेत नव्हते, घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा लाजीरवाणा प्रकार कांग्रेसतर्फे करण्यात आला.
वंजारी यांचं भवितव्य गुटबाजीवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here