घुगूस मध्ये खुलेआम वाळू तस्करी

0
589
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – नकोडा येथील वर्धा नदी जवळील चिंचोली घाटावर वाळू माफियांनी हजारो ब्रास रेती साठवून ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शहरात मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळू ची वाहतूक जोमात सुरू आहे, कारवाई फक्त नाममात्र होत असताना घुगूस येथील तलाठी, नायब तहसीलदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे सोंग घेऊन आहे.
वाळू माफियांवर नजर ठेवण्यासाठी महसूल विभागाने पोलीस स्टेशन समोर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविले मात्र वाळू माफिया कॅमेऱ्याला हात दाखवीत तिथून जात आहे असे असताना सुद्धा त्या कॅमेराचा उपयोग काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
तलाठी पिल्ले घुगूस शहरात अनेक वर्षांपासून ठाण मारून बसलेले आहे परंतु कारवाईच्या नावाने मात्र ते खुर्चीवर चिकटून बसलेले आहे असे चित्र प्रशासनाला दाखवीत आहे.
शहरात रोज होणार शासनाचं महसुलाच नुकसान अधिकाऱ्यांमुळे होत आहे.
अधिकारी, कर्मचारी यांच्या संगणमताशिवाय ही तस्करी शक्य नाही, खनिकर्म अधिकारी धाड मारण्याआधी वाळू तस्करांना तात्काळ माहिती पोहचून जाते.
कार्यालयीन बाब ही वाळू माफियांना कळते तरी कशी याची चौकशी खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी करायला हवी जेणेकरून वाळू माफियांचे शुभचिंतक समोर येतील.
अनेक वर्षांपासून महसूल प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना वाळू माफिया लावत आहे.
आज हजारो ब्रास रेती साठवणूक करण्याची हिंमत त्या माफियांची होते तरी कशी यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here