आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील पदविधराला विनाअट शासकीय नोकरी – एड. सुनीता पाटील

0
438
Advertisements

चंद्रपूर – नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या 29 नोव्हेंबर प्रचाराचा शेवटचा दिवस, निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांच्या मनात अपक्ष उमेदवारांनी चांगलीच धडकी निर्माण केली आहे.
चंद्रपूर शहरातील अधिवक्ता सुनीता मनोहर पाटील या निवडणुकीच्या मैदानात धडक द्यायला तयार झाल्या असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला असून पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
निवडणूक दर 5 वर्षांनी होणार मात्र पदवीधरांच्या समस्या जैसे थे च आहे.
मागील अनेक वर्षांपासून पदवीधर निवडणुकीत भाजपने बाजी मारली मात्र समस्या कुणाच्या सुटलेल्या नाही उलट त्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या.
पदवीचे शिक्षण पूर्ण करताच पदवीधरांना 1 वर्षाचे आत शासकीय नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता सुरू करण्यासाठी प्रथम पुढाकार, कंत्राटी पद्धती बंद करून थेट नोकरीत सामावून घेण्याची पद्धत सुरू करणार, स्वयंरोजगार युवकांसाठी विनातरण 50 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारातील पदवीधराला विनाअट शासकीय नोकरीत सामावून घेणार असल्याचा वचन नामा अधिवक्ता सुनीता पाटील यांनी जाहीर केला आहे.
अनेक वर्षांपासून न्यायालयात त्यांनी पीडितांना न्याय देण्याचा काम अविरत सुरू असून पुढेही तो असाच सुरू राहणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली आहे.
प्रस्थापित उमेदवारांना आता विस्थापित करण्याची वेळ आली आहे, पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या हक्काचा आमदार निवडून देण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

पदवीधरानो आपल्या पसंतीचे प्रथम क्रमांक माझ्या नावासमोर लिहून पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी एक संधी देण्याचं निवेदन पाटील यांनी यावेळी दिल आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here