चंद्रपूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एकाच दिवशी अवैध दारू वाहतुकीच्या 2 कारवाया व देशी विदेशी दारू जप्त केल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले.
28 नोव्हेम्बरला चंद्रपूर मूल रोडवर पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून अवैध दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली असता त्यांनी सापळा रचून चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 के 1732 या वाहनाला अडवून चौकशी केली असता सदर वाहनात देशी दारूचे 3 बॉक्स मिळून आले.
अवैध दारू सहित 2 लाख 77 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपी रयतवारी कॉलरी परिसरात राहणार 31 वर्षीय शंकर कंडू ला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत बल्लारपूर बायपास मार्गावर सकाळी 9 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 एए 8933 मध्ये भरारी पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालक गाडी थांबवून पसार झाला, सदर वाहनात 6 बॉक्स विदेशी दारू एकूण मुद्देमाल 3 लाख 70 हजार 320 चा जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवाईत 6 लाख 48 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई सागर धोमकर अधीक्षक उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील चंद्रपूर गडचिरोली चे दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, संदीप राठोड, अमोल भोयर, प्रशांत घोडमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर लागोपाठ कारवाई
Advertisements