जिल्हा युवा सेनेतर्फे गरजुंना ब्लॅंकेटचे वितरण

0
262
Advertisements

भद्रावती / अब्बास अजानी

युवा सेना प्रमुख नामदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेशदादा कदम,जिल्हा शिवसेना प्रमुख नितीन मत्ते, संदिप गि-हे, चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवा सेनेतर्फे गरजुंना नुकतेच ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार थंडीच्या दिवसात रस्त्याच्या बाजुला झोपणा-या गरजू लोकांचे थंडीपासून संरक्षण करण्याच्या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला.यावेळी युवा सेनेचे जिल्हा संघटक हर्षल शिंदे यांच्याकडून गरजुंना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक पप्पू सारवन,तालुका संघटक महेश जीवतोडे, शैलेश पारेकर, अमोल कोल्हे,कल्याण मंडल,नितीन गेडाम, सुशांत पढाल आदी युवासैनिक उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here