टिटीसी केंद्र चा दर्जा वाढवुन जिल्ह्यात अद्यावत असे ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करण्याची गरज

0
136
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हयातील वाढती वाघ व इतर वन्यप्राण्याची संख्या व मानव वन्यप्राणी संघर्ष लक्षात घेता चंद्रपूर येथील तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्र (ट्रांजीट ट्रीटमेंट सेंटर – टिटीसी) चा दर्जा वाढवुन अद्यावत असे ‘रेस्क्यू सेंटर’तयार करण्याची मागणी राज्याचे वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), ताडोबा क्षेत्रसंचालक यांना निवेदन यांचेकडे मानद वन्यजीव रक्षक तथा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे सदस्य बंडू धोतरे यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा असुन येथील वाढती वाघांच्या संख्येसोबतच इतरही वन्यप्राणी यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोबतच मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनेत सुध्दा दिवसागणीक वाढ होत आहे. जिल्हयातील वाघ-मानव संघर्ष यावर राज्यशासनाने नुकतेच अभ्यासगट करून यावर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. चंद्रपूर जिल्हयातील वाढलेली वाघ-बिबटची संख्या, मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये जेरबंद करण्यात येणारे वाघ-बिबट, जखमी वन्यप्राणी यांची संख्या यात वाढ होत आहे. त्याकरीता नागपुर गोरेवाडा रेस्क्यु सेंटर वर निर्भर राहावे लागत आहे, आणि गोरवाडा प्राणीसंग्रहालयची प्राणी ठेवण्याची क्षमता सुध्दा संपलेली आहे. अश्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असल्याने वेळेची गरज लक्षात घेता चंद्रपूर टिटीसी चा दर्जा वाढवून, अधिक क्षमतेचे ‘रेस्क्यु सेंटर’ तयार करण्यात आल्यास भविष्यातील अनेक अडचणी दूर करता येईल.

Advertisements

चंद्रपूर ‘टिटिसी-तात्पुरता वन्यप्राणी निवारा केंद्र’ असताना सुध्दा अनेकदा वाघ व इतर वन्यजीव अनेक महीने पुढील कार्यवाहीच्या प्रतिक्षेत येथेच असतात. मात्र त्यांना मनुष्य संपर्कापासुन दुर ठेवण्याच्या दृष्टीने येथे योग्य व्यवस्था नाही. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सापडलेली मादी बछडा 7-8 महीनेपासुन याच ‘टिटीसी’ ला होती नंतर बोरीवली, मुंबई येथे हलविण्यात आले आहे. अजुन नव्याने ताडोबा-बफर मधील वाघाचे दोन बछडे महीन्याभरापासुन टिटिसीला ठेवण्यात आलेले आहे. सध्यस्थितीत असलेली टिटिसी ची रचना आणी बांधकाम वन्यप्राणी जास्त काळ ठेवण्याच्या दृष्टीने योग्य नाही. येथे कायम कर्मचारी व अन्य व्यक्ती येत असल्याने समोर येताच वन्यप्राणी दृष्टीस पडतो. येथील उपचार केंद्र, कार्यालय आणी वाघ-बिबट ठेवण्याचे पिंजरे एकाच दर्शनीय भागात असल्याने, वन्यप्राणी करीता मनुष्य दिसणार नाही अशी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने कायमच पिंजÚयातील वन्यप्राणी मनुष्याच्या संपर्कात येत असते, तेव्हा त्वरीत काही किरकोळ बदल या बांधकामात करण्याची गरज आहे. तसेच भविष्यातील गरज लक्षात घेउन ‘रेस्क्यु सेंटर’चा प्रस्ताव तयार करण्याची गरज आहे.

जिल्हयातील वाघ-मानव संघर्षामुळे चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असुन एखादया क्षेत्रात वाघ किंवा बिबट कडुन सलग मनुष्यहाणीच्या घटना घडु लागल्या की मोठा तिव्र संघर्ष होण्याआधी नियंत्रण मिळविणे गरजेचे ठरते, तेव्हा रेस्क्यु सेंटरची अदयावत यंत्रणा व टिमचे सहकार्य महत्वाचे ठरेल. तसेच जिल्यात वन्यप्राणी यांना उपचाराची गरज असल्यास त्यांना सुध्दा गोरेवाडा रेस्क्यु सेंटर वर निर्भर राहावे लागते. जिल्हयात वन्यप्राणी अपघात झाल्यास त्यांना त्वरीत उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक तपासण्या करून शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, येथील वनक्षेत्रातील मादीपासुन वेगळे झालेले वाघांचे बछडे पुर्ववत जंगलात सोडण्याच्या दृष्टीने त्यांना वेगळे ठेवण्याच्या दृष्टीने, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने सुध्दा आवश्यक व्यवस्था रेस्क्यु सेंटरच्या माध्यमाने तयार करणे शक्य होईल. मानव-वन्यप्राणी संघर्षात पकडण्यात आलेले वाघ-बिबट यांना टिटिसी ला व्यवस्था नसल्याने नागपुर गोरेवाडा प्राणी संग्रहालय किंवा राज्यात इतरत्र स्थांनातरण करावे लागत. गोरेवाडा ला सुध्दा सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्यातुनच पाठविण्यात आलेले आहेत.
यामुळे जिल्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, जिल्यातील वाढलेली वाघांची संख्या, सोबतच वाघ-मानव संघर्ष याचा विचार करता चंद्रपूर येथील टिटिसीचा दर्जा वाढवुन अदयावत असे ‘रेस्क्यु सेंटर’ उभारण्याची मागणी बंडू धोतरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here