गडचांदूरात भाजपा व मित्र पक्षांचे उमेदवार “संदीप जोशीं” ची संवाद सभा

0
383
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील,भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी (आठवले गट),बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरीप यांचे अधिकृत उमेदवार “संदीप जोशी” यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी हे होते.चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,पोंभुर्णा पं.स.सभापती तथा भाजपा महिला जिल्हाध्यक्षा अल्काताई आत्राम,चंद्रपूर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे,चंद्रपूर जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले,चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष आशिष देवतळे,राजू घरोटे,नारायण हिवरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
सदरच्या संवाद सभेत देवराव भोंगळे व हंसराज अहीर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आपल्या पक्षाने नागपूर पदवीधर मतदार संघात संदीप जोशी सारख्या कणखर नेतृत्व असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे.जोशी यांनी युवा संघटने पासून मोठमोठी पदे पक्षात भूषविले आणि पक्षाने यांना दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पडली.ते सध्या महापौर असून नागपूर शहराच्या विकासात यांचा मोठा वाटा आहे.अशा नेतृत्वाची आज खऱ्या अर्थाने गरज असून 1958 पासून हा मतदार संघ भाजपाकडे राहिला फक्त आपल्या सारख्या कार्यकर्त्यांमुळेच.म्हणून आज सुद्धा आम्हाला विश्वास आहे की,यावेळेस सुध्दा आपण प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडाल,असा विश्वास असल्याचे ते बोलले.
पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांमुळेच हा मतदार संघ मागील 50 वर्ष्या पासून भाजपच्या ताब्यात आहे. यंदाही हीच परंपरा आजही कायम ठेवाल असा मला विश्वास आहे.मी निवडून आल्यानंतर विध्यार्थी,शैक्षणिक,शिक्षकांचे व सर्व पदवीधर मतदारांचे कामा मार्गी लावण्याचे वचन देतो,मला युवा मोर्चा ते वार्ड प्रमुखापासून तर आज नागपूर सारख्या शहराच्या महापौर पदाची जबाबदारी पक्षाने दिली असून मी माझ्या कर्तव्यास व आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,याची ग्वाही देतो.आपण मला पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे अशी विनंती जोशी यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्तांना केली.यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,जेष्ठ नेते महेश शर्मा, शिवाजी सेलोकर,हरीश घोरे,संदिप शेरकी, पुरुषोत्तम भोंगळे,जगदीश पिंपळकर,प्रमोद पायघन,रोहन काकडे,राकेश अरोरा, सत्यदेव शर्मा,दिनेश खडसे,कार्तिक गोंलावर,आशिष ताजने इतरांची उपस्थिती होती.
मात्र याठिकाणी सुद्धा मित्र पक्षाच्या नेत्यांचे दर्शन झाले नसल्याने शहरातील भाजपच्या जबाबदार नेत्यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, “आपल्याकडे मित्र पक्षातील आरपीआय (आठवले गट) सध्या अस्तित्वात आहे.आणि त्याच्या प्रमुखांना सदर कार्यक्रमात आमंत्रित केले होते परंतु ते शहेरा बाहेर असल्याने येऊ शकले नाही अशी माहिती News34 प्रतिनिधीला दूरध्वनीवरून देण्यात आली आहे.कार्यक्रमाचे संचालन सतीष उपलेंचीवार आभार निलेश ताजने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here