पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी बहुजन चेहरा सभागृहात पाठवा – ना.विजय वडेट्टीवार

0
317
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, पिरिपा कवाडे व गवई गट आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील जाण असणारा तरूण चेहरा नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिला आहे.पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीने दिलेल्या बहुजन चेहऱ्यास विधानपरिषदेत पाठविण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.ते शनिवार रोजी गडचांदूरात कोरपना व जिवती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजीत प्रचार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर चापले,जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हाध्यक्ष दुष्यंत निमकर,कृ.उ.स.चे अध्यक्ष श्रीधर गोडे,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक विजय बावणे,पं.स.सभापती सौ.रूपाली तोडासे, नगराध्यक्षा सविता टेकाम, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विठ्ठल थिपे,गणपत आडे, रंजन लांडे,प्रा.डॉ.शशिकांत आस्वले, विजुक्टाचे प्रा.धनंजय काळे,महाराष्ट्र पदवीधर डी.एड.माध्यमिक महासंघ बंडू धोटे,आश्रम शाळा शिक्षक महासंघाचे अशोक बावणे,प्रा.अनील मुसळे,धनंजय गोरे,डॉ.हेमचंद दूधगवळी,डॉ.शरद बेलोरकर,न.प.गटनेता विक्रम येरणे, सभापती सौ.जयश्री ताकसांडे, नगरसेवक राहुल उमरे,अरविंद मेश्राम,अर्चना वांढरे, पापय्या पोन्नमवार,गडचांदूर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी, शहराध्यक्ष संतोष महाडोळे आदींची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना.वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या वतीने जुनी पेंशन योजना व विनाअनुदानित शाळांचा प्रश्नावर सुद्धा विधानभवनात चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले.खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर कडाडून टीका केली.गेल्या 42 वर्षांपासून पदवीधरांचे नेतृत्व करणाऱ्यांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला.राजुरा विधानसभा क्षेत्र काँग्रेस विचारसरणीचा गड राहिला असून प्रत्येक निवडणुकीत या विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्‍य असते.यावेळी मात्र पूर्वीपेक्षाही जास्त मताधिक्‍य मिळणार असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर निवडणूक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,पिरिपा कवाडे व गवई गट आणि मित्र पक्ष महाविकास आघाडी लढत आहे.मात्र गडचांदूरात झालेल्या प्रचार कार्यक्रमात मित्र पक्ष असलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,पिरिपा गटांचे जिल्हा पातळीवरील तर सोडा,शहराचे सुद्धा एकही नेते उपस्थित नव्हते.या संदर्भात काही मित्र पक्षांच्या स्थानिक प्रमुख नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता काहींनी सांगितले की, “बोलावणे तर दुरच,आम्हाला कार्यक्रमाची साधी माहिती सुध्दा नाही” तर काहींनी “फोन आला होता परंतु काही कारणास्तव आम्ही गेलो नसल्याची” माहिती News34 प्रतिनिधींना दिली.सदर प्रकार हा मित्र पक्षांच्या नेत्यांना जाणूनबुजून डावलण्याचा तर नाही ना ! अशी शंका व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.आशिष देरकर, प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय गोरे तर आभार यु.काँ.तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी मानले.सतीश बेतावर,नितीन बावणे,मिलिंद ताकसांडे,रूपेश चुदरी,अतूल गोरे,उमेश राजूरकर,मकसूद सैय्यद,प्रितम सातपुते, उदय काकडे,लोकेश कोडापे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here