Advertisements
प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – जिल्ह्यातील लहान पंढरपूर म्हणून घुगूस येथील वढा हे गाव प्रसिद्ध आहे, याठिकाणी वर्धा-पैनगंगा व उत्तरवाहिनी नद्यांचा संगम आहे, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला वढा येथे यात्रा भरत असते.
जिल्ह्यातील व बाहेर राज्यातील हजारो नागरिक दरवर्षी नदीच्या काठावरील विठ्ठल रखुमाई मंदिर व दुसऱ्या काठावर स्थित हेमाडपंती शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
मात्र यावर्षी देशात कोरोनाचा हाहाकार माजला असतांना ऐतिहासिक वढा यात्रा यावेळी रद्द करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना 30 नोव्हेम्बरला कुणीही या ठिकाणी येऊन गर्दी करू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा व जमावबंदी कायदा लागू असल्याने व कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.