33 वर्षीय युवकाचा 90 वर्षीय वृद्धेवर अत्याचार

0
2001
Advertisements

चिमूर – भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत महालगाव येथे राहणाऱ्या 33 वर्षीय नरेंद्र ननावरे यांनी गावातीलच 90 वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 26 नोव्हेम्बरच्या दिवशी घडली.
26 नोव्हेम्बरच्या रात्री आरोपी नरेंद्र नन्नावरे यांनी अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या घरी प्रवेश केला, पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला, त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जेव्हा वृद्धेच्या खोलीकडे धाव घेतली असता पुढचं दृश्य त्यांच्या मनाला हादरावणारे होते.
वृद्ध महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती, महिलेने घडलेला प्रकार मुलाला सांगितला असता त्यांनी तात्काळ भीसी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नरेंद्र नन्नावरे च्या विरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ 376, 450 व 323 अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी नरेंद्रला अटक केली.
ही संतापजनक घटना गावातील नागरिकांना माहिती पडली असता त्यांनी तात्काळ त्या नराधम वृत्तीच्या नरेंद्रला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here