चंद्रपूर – हिंदु समाजाची गीता, मुस्लिमांचा कुराण, बौद्ध बांधवांचा त्रिटक, सिख बांधवांचा ग्रंथ गुरु साहिबजी, ख्रिश्चन बांधावांचा बायबल असा सर्व धर्मांचा एक धर्मग्रंथ असतो. याच पवित्र ग्रंथाच्या आधारावर प्रत्येक धर्म चालत असतो. तसेच हा देश ज्या संविधानावर चालतो ते संविधानही राष्ट्रधर्माचा ग्रंथ असून या राष्ट्रधर्म ग्रंथामधील अधिकाराची माहिती आणि त्यातून मिळणा-या हक्कांबाबत जनजागृती सर्वसामान्यांमध्ये व्हावी यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संवधिनाच्या २० हजार लघू पुस्तिका तयार करुन त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले.
भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने काल २६ नोव्हेबरला म्हणजेच संविधान दिनी बाबूपेठ येथील बोधीत्सव बुध्द विहार येथे संविधान सन्मान राष्ट्रीय दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला समारंभाचे अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक एन. डि. पिंपळे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एम.डब्लू. पुनवटकर, यंग चांदा ब्रिगेडचे शहर विद्यार्थी प्रमुख अजय दुर्गे, सुरेश नारनवरे, जितेंद्र डोहणे, रचना धोटे आदिंची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारत हा लोकतांत्रीक देश असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या आधारावर चालतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. देशावर येणा-या संकटप्रसंगी सारे भारतीय, सारे भेद विसरून एकत्र येतात. ही ताकद आपल्या भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून असल्याचे यावेळी ते म्हणाले
या संविधानाने सर्वांना आपल्या हक्कांप्रती लढण्याचे अधिकार दिले आहे. मात्र या अधिकारांप्रती जागृत राहण्याचीही गरज आहे. येत्या काळात संविधानाने दिलेल्या हक्काप्रंती जनजागृती करण्याची मोहिम आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबवणार असून यासाठी संविधानाचे २० हजार लघू पुस्तके प्रकाशीत करुन ते वाटप करणार असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आज आमदार होऊ शकल्याचा पूनरउच्चार यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलतांना केला. यावेळी सर्वप्रथम संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यांनतर उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संविधानाच्या २० हजार लघू पुस्तीका प्रकाशीत करुन वाटप करणार – आ. किशोर जोरगेवार
Advertisements