मतदार राजा मंचावर तर राजकीय पुढारी मंचासमोर

0
199
Advertisements

चंद्रपूर – ओबीसी समाजाच्या संवैधानिक मागण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिनी भव्य विशाल महामोर्चा निघाला होता, हजारो ओबीसी नागरिक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला होता.
आयोजित महामोर्चाच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार धानोरकर, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे हे पुढारी मंचावर न बसता नागरिकांमध्ये बसले होते.
समाजमाध्यमांवर या गोष्टींचे खूप कौतुक झाले, की इतके मोठे पुढारी मंचावर बसले नव्हते.
त्यांचं मंचावर न बसणं खरंच कौतुकास्पद होते का?
याच उत्तर हे नाहीचं, कारण ज्या साधारण व्यक्तीला आपण जेव्हा पुढारी बनवितो तो नागरिकांचा लोक प्रतिनिधी असतो.
त्यांना बनविणारे आपण, मंचावर न बसने हा त्यांचा साधेपणा नव्हता, मतदार हा राजा आहे, 5 वर्षानंतर तो आपल्या मतदानाचा हक्क बजावून सामान्य राजकीय कार्यकर्त्याना विधानसभा, लोकसभेत पाठवितो.
पुढे चालून या गोष्टीवर राजकारण नक्कीच होणार. यामध्ये कौतुकास्पद असे काही नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here