प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, वाळू तस्करांनी प्रशासनाच्या नाकी नऊ आणले.
काही प्रमाणात प्रशासन कारवाई करीत आहे मात्र वाळू तस्कर शिजोर असल्याने प्रशासनाची यंत्रणा सुद्धा या तस्करांसमोर हतबल झाली आहे.
घुगूस शहरात सुद्धा वाळू तस्करांनी थैमान घातले आहे, दिवसरात्र वर्धा नदीच्या पत्रातून हजारो ब्रास वाळूची वाहतूक होत आहे.
मात्र यावर उपाय म्हणून महसूल प्रशासनाने घुगूस पोलीस स्टेशनच्या फलकावर सीसीटीव्ही लावले जेणेकरून वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाची पाळत असावी मात्र सीसीटीव्ही ला सुद्धा तस्कर चपराक देत आहेत.
पोलीस स्टेशन समोरील लावण्यात आलेल्या 2 सीसीटीव्ही कॅमेरा समोरून हे वाळू तस्कर मुजोरीने वाळूची वाहतूक करीत आहे मात्र यावर कारवाई शून्य बरोबर आहे.
म्हणजेच हे सीसीटीव्ही फक्त दिखाव्यासाठी तर प्रशासनाने लावले नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.