भद्रावती /अब्बास अजानी
बुधवार ला आठवडी बाजार भरतो आणि बाहेर गावातिल नागरिक बाजरा करिता भद्रावतीत येतात त्याकरिता सर्वसामान्य नागरिकांमधे कोरोंना विषयक जनजागृति करण्या करीता त्याच बरोबर सर्वाना मास्क आणि सैनिटाइजर वाटप
करण्यात आले. आणि याप्रसंगी नगराध्यक्ष अनीलभाऊ धानोरकर नी संबोधित केले. “भद्रावतीवासियानो कृपया काळजी घ्या. बाहेर भरपूर गर्दी होत आहे. सोन्यासारखी माणसं डोळ्यादेखत कोरोनाने जात आहेत. सध्याच्या काळात सर्वात जास्त धोकादायक जीवन झाले आहे. त्रास झाला तरी हरकत नाही परंतु जीवाला जपा.”
सर्वाना आवाहन केले.
या रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष विनोद कामडी, सचिव प्रवीण महाजन, भाविक तेलंग, सुधीर पारोधि, विक्रांत बिसेन, विवेक आकोजवार, आनंद क्षीरसागर, किशोर खंडालकर,तसेच नगरसेवक संतोष आमने, विनोद वानखेड़े, पांडुरंग टोंगे, देवानंद पिंपलकर, पारखी, दीपक नीकुरे, मुनाज शेख, स्वप्निल मोहितकर, गोपाल सातपुते तसेच पत्रकार सुनील बिपटे आणि बरिच मंडली उपस्थित होती.