चंद्रपूर – मागील 1 महिन्यापासून जिल्ह्यातील विखुरलेल्या ओबीसी समाजाला एकत्र करून 26 नोव्हेंबर संविधान दिनी ओबीसींच्या संवैधानिक हक्कासाठी महामोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या महामोर्चाची सुरुवात सकाळी आंबेडकर महाविद्यालय परिसरात ओबीसी बांधव विविध तालुक्यातून आपली ताकद दाखविण्यासाठी जमा झाले.
नंतर शहरातील मुख्य मार्गाची परिक्रमा करीत परत चांदा क्लब ग्राउंडवर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
2021 ला होऊ घातलेली जनगणना मध्ये ओबीसीचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, देशात आज सर्वात जास्त ओबीसींच्या संख्या असून सुद्धा शासनकर्ते स्वतंत्र जनगणना करायला तयार नाही.
90 वर्षा अगोदर इंग्रजांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली होती त्यावेळी आपली संख्या ही 54 टक्के होती मात्र आरक्षण हे 27 टक्केच मिळाले.
हा अन्याय आपल्यावर शासन कर्त्यांनी केला, आपल्या समाजाच्या उत्थानासाठी महामंडळ, मंडळ आयोगाची स्थापना करावी अश्या विविध मागण्या ओबीसी समाजाच्या आहे.
यावर जनप्रतिनिधी सुद्धा उदासीन आहे, यासाठी ओबीसी जनगणना समनव्य समितीने सर्व ओबीसी समाजबांधवांना एकत्र करीत महामोर्चा काढला, या मोर्च्यात लाखो ओबीसी बांधव उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात समितीचे सदस्यांनी मार्गदर्शन करीत आपले विचार व्यक्त केले.
या मोर्च्याच्या आयोजनाचे कुशल नेतृत्व म्हणून बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, विजय बदखल, विजय मुसळे, सूर्यकांत खनके अश्या अनेक सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
हम आ गये लाखोंसे….
Advertisements